Viral Video: सापाचं नाव काढलं तरी अनेकांना भीती वाटते. सापांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही प्रजातीतील साप केवळ दंश करून एखाद्याचा जीव घेऊ शकतात. अनेकदा इंटरनेटवर सापांसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भलामोठा साप चक्क स्कूटीच्या हॅण्डलमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता.
विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो किंग कोब्रा आहे. एवढा भयंकर साप स्कूटीमध्ये गेलाच कसा असा प्रश्न तुम्हालाही पडले. परंतु हे खरं आहे. स्कूटीच्या हॅण्डलमधून सर्पमित्राने किंग कोब्राची सुरक्षितरित्या सुटका केली आहे.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक सर्पमित्र चक्क स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने स्कूटीमधून कोब्रा साप बाहेर काढताना दिसत आहे. कोणतीही भीती न बाळगता आणि कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय तो आपले रोजचे काम असल्याप्रमाणे सापाला बाहेर काढत आहे.
हा व्हिडिओ पाहत असताना कोणत्याही क्षणी कोब्रा त्याला दंश करेल असे वाटत राहते. परंतु या सर्पमित्राचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. व्हिडिओमध्ये एक काळा किंग कोब्रा स्कूटीच्या पुढच्या बाजूला स्कूटीत जाऊन बसल्याचे दिसत आहे. हा क्रोब्रा स्कूटीच्या हॅण्डलमध्ये तर जाऊन बसला मात्र तो तिथेच अडकला होता. त्यानतंर स्कूटीच्या मालकाला कोब्रा दिसला तेव्हा त्याला धक्काच बसला. काही क्षण तर त्याला काय करावे सूचलेच नाही. अखेर त्याने सर्पमित्राला बोलवले आणि त्याने सापाची सुखरुप सुटका केली.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @paganhindu या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. यूजर्स त्याला वेगाने शेअर करत आहेत. अवघ्या 39 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 84.5 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






