जळगाव :- उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्याची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ आर ओ तात्यांचे माझ्यावर उपकार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत येत असतील तर त्यांचे स्वागत मात्र त्यांनी चौकटीत बोलावं. तसं पत्र मी एसपींना देणार आहे. संजय राऊत सारखा माणूस माझ्याविषयी बोलणार असेल तर सभेत घुसेल असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
मार्च महिन्यात मालेगाव येथील सभेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील तसेच नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सणकून टीका केली होती. संजय राऊत हे राज्यसभेवर आमच्यामुळे निवडून गेले असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अरे मिंध्या पहिले आम्ही दिलेलं मत वापस कर. कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे, त्याचप्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली होती.
ठाकरे विरुद्ध शिंदे गट
जळगावचे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे. येत्या 23 तारखेला होणारा हा कार्यक्रम शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील. त्यामुळे परस्परांवर आरोप-प्रत्यारोपही होतील.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






