जालना :- मेहूणीच्या प्रेमासाठी वेडापीसा झालेल्या एका विवाहीत तरुणाला जालना पोलिसांनी अटक केली आहे. बलराम जयसिंग शिंगणे असे या तरुणाचे नाव आहे.बायकोच्या लहाण बहिणीवर म्हणजेच मेहूणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. लहाण मेहूणीचा दाजी असलेल्या या बलराम नामक तरुणाने चक्क आपल्या साडूला म्हणजेच मेहूणीच्या पतीला फोन केला आणि ‘मला तुझी बायको आवडते. तिला सोडून दे’ असे सांगितल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
बलराम जयसिंग शिंगणे याच्या 19 वर्षीय मेहुणीचे देऊळगावराजा तालुक्यातील एका तरुणासोबत लग्न झाले आहे. या लग्नाला काही दिवस उलटल्यानंतर बलराम शिंगणे याने थेट आपल्या साडूला फोन केला. तो केवळ फोन करुनच थांबला नाही. त्याने थेट ‘मला तुझी बायको आवडते. तिला सोडून दे’ असे म्हणत मेहूणीच्या पतीला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या. या घटनेमुळे सदर महिलेच्या पतीच्या मनात शंका निर्माण झाल्या.त्यातून उभय पतीपत्नीमध्ये वाद निर्माण झाले.
त्यातून 19 वर्षांचीही विवाहीता जालना येथील हनुमानघाट येथे माहेरी जाऊन राहू लागली. इतके सगळे घडल्यावरही दाजी असलेल्या बललाम याचे पोट भरले नाही.बलराम शिंगणे एक दिवस सासरवाडीला गेला. तेथे माहेली आलेल्या 19 वर्षी विवाहीत मेहूणीशी त्याने सलगी केली. तसेच, 30 डिसेंबर 2022 रोजी त्याने आधार कार्ड दुरुस्त करुन देण्याच्या बहाण्याने तिला रोहणवाडी येथे नेले. तिथे त्याने मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर त्याने सातत्याने अत्याचार करणे सुरुच ठेवले.
मेहूणी सहन करत असल्याचे पाहून त्याने तिच्यावरील अत्याचार वाढवतच नेले. उलट पुढे जाऊन त्याने मेहूणीला शिर्डी आणि इतरही अनेक ठिकाणी नेऊन अत्याचार केले. तसेच, घडला प्रकार कोणाला सांगितला तर आई, बहीण आणि भावाला जीवे मारले जाईल,अशी थेट धमकी दिली. या धमक्याही त्याने तिला वारंवार दिल्या. अखेर अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने जालना येथील सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि दाजी म्हणजेच मेहुण्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि बलराम शिंगणे याला अटक केली. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






