सटाणा :- तालुक्यातील लखमापूर येथील सख्ख्या पित्याने आपल्या सतरावर्षीय मुलीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पित्यास गुरुवारी (दि.२०) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लखमापूर येथील शेतशिवारात राहणाऱ्या साक्षी अनिल ठाकरे (१७) या युवतीचा विजेचा धक्का लागून आकस्मिक मृत्यू झाल्याची खबर मंगळवारी (दि. १८) सटाणा पोलिसांना देण्यात आली होती.
परंतु याबाबत संबंधित मुलीचा तिचे वडील अनिल खंडू ठाकरे (४६) यांनीच खून केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपास केला.त्यावेळी मयत मुलीच्या गळ्यावर व्रण असल्याचे लक्षात आले. व्रण लक्षात येऊ नये यासाठी गळ्यावर पावडर लावल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी पित्यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता मुलगी दोन वेळा न सांगता प्रियकराच्या घरी गेली आणि त्यामुळे गावात बदनामी झाली, याचा राग ठेवून पित्याने हे कृत्य केल्याचे पुढे आले.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






