बीड : वहिनी दिराच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. विधवा वहिनी आंघोळीसाठी गेलेली असताना दिराने बाथरुमध्ये प्रवेश केला आणि वहिनीशी अश्लील चाळे करत शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडलीय.या प्रकरणी बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडच्या धारूर तालुक्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. दिरानेच आपल्या विधवा वहिनीचा विनयभंग केला आहे. वहिनी “तू खूप चांगली दिसते, मला आवडतेस” असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित विधवा महिला गावातील शेतवस्तीवर आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. ती आंघोळ करीत असताना तिचा सख्खा दीर बाथरूममध्ये घुसला व तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करू लागला. यादरम्यान “तू मला खूप आवडतेस, म्हणत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यावर नकार देताच त्याने तिला धमकीही दिली.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






