जळगाव :- उद्धव ठाकरे यांची जळगावच्या पाचोऱ्यामध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेआधी जळगावमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाहीत सभेत घुसणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. गुलाबरावांच्या या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनीही त्यांना चॅलेंज दिलं. सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असं संजय राऊत म्हणाले. एवढच नाही तर संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख गुलाबो गँग असाही केला.
संजय राऊतांच्या चॅलेंजनंतर आता गुलाबराव पाटील यांचे समर्थक उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जळगाववरून रवाना झाले आहेत. जळगावच्या सागर पार्क मैदानावरून शेकडो शिवसैनिक ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी निघाले आहेत. या शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घातले आहेत. गुलाबराव पाटील यांचे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत पाचोऱ्याच्या दिशेने निघाले आहेत.
संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर शिंदेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसंच त्यांनी राऊतांचा इशाराही स्विकारला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभेआधीच जळगावचं वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. नंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासभेचं आयोजन आर.ओ. पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केलं आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






