पैठण : पतीच्या निधनानंतर तेराव्याचा कार्यक्रम संपवून चुलत सासूच्या घरामध्ये आराम करीत असलेल्या एका असाह्य महिलेवर अत्याचार करून जीवे मारुन टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.पीडित महिलेने चुलत दिराविरोधात आज (दि.२३) फिर्याद दिली असून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील एका गावातील महिलेच्या पतीचे निधन झाले. पतीच्या तेराव्याचा कार्यक्रम संपवून पीडित महिला घरामध्ये विश्रांती घेत होती. यावेळी घरामध्ये कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चुलत दीराने पीडितेवर अत्याचार केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, पोलीस नाईक संतोष तोडकर करीत आहेत.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






