नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न आजच्या घटनेमुळे निर्माण झाला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. गोळीबाराची सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये आज दुपारी एका वकिलाने महिलेवर गोळीबार केला. वकिलांच्या वेशात हा हल्लेखोर आला होता होता.
कोर्टाच्या आवारातच या हल्लेखोराची आणि जखमी महिलेची झटापट झाली. त्यानंतर पिस्तुल काढून त्याने 3 राऊंड फायर केले.हल्लेखोराने पहिली गोळी झाडल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी महिलेनं धाव घेतली. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करून गोळीबार केला.
धक्कादायक म्हणजे, हा गोळीबार सुरू असता कोर्टाच्या परिसरात चांगलीच गर्दी होती. ही महिला . न्यू फ्रेंड्स कॉलनीशी संबंधित एका प्रकरणावर कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने महिला आल्यावर तिच्यावर गोळीबार केला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हल्लेखोराने पीडित महिलेवर चार गोळ्या झाडल्यात. गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टाच्या परिसरातच गोळीबार झाल्यामुळे कोर्टातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






