जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
वृषभ :-
काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.
मिथुन :-
लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.
कर्क :-
मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
सिंह :-
चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.
कन्या :-
मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.
तूळ :-
योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडे पणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.
वृश्चिक :-
भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.
धनू :-
जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात.
मकर :-
जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.
कुंभ :-
स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
मीन :-
हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






