Home Remedies to Stop a Bad Cough : सर्दी, खोकल्यामुळे तापही येऊ शकतो. यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन थकवा, शारीरिक वेदना जाणवतात.
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक आजार उद्भवतात. दिवसभर घामानं त्वचेवर चिकटपणा येतो याशिवाय सुका खोकलाही वाढतो. हवेशीर खोल्यांमध्ये एसीमध्ये बसल्यानं अनेकदा आजार वाढतात. (What is the fastest way to cure a cough) उन्हाळ्याच्या दिवसात गारवा मिळण्यासाठी थंड पेय, आईस्क्रीमचं सेवन केलं जातं. पण थंड पदार्थ खाल्ल्यानं तब्येत खराब होते. सर्दी, खोकल्यामुळे तापही येऊ शकतो. यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन थकवा, शारीरिक वेदना जाणवतात.
सुक्या खोकल्यापासून आराम मिळवण्याचे उपाय .
१) हळद, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, घसा खवखवणे आणि सूज दूर करण्याचे काम करते. यामध्ये असलेले कर्क्युमिन श्वसनाच्या आजारांमध्येही फायदेशीर ठरते. घशात जळजळ होऊ नये म्हणून दुधात एक छोटा चमचा हळद मिसळून प्यायल्याने घशाचा संसर्ग बरा होतो.
२) उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. थंड पदार्थांऐवजी, कोमट किंवा साधे पाणी प्या. याशिवाय घशाच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी दिवसातून दोनदा ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये रोझमेरीची पाने आणि पुदिन्याची पाने देखील टाकू शकता. पुदिन्याची पाने घशात जमा होणारा कफ काढून टाकण्याचे काम करतात.
३) कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कांदा खा. कच्चा कांदा कफाची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. घशासोबतच कच्चा कांदा खाणे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.
४) कोरड्या खोकल्याबरोबरच लोकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत वाफ घेणं हा एक उत्तम उपाय आहे. लहान मुले असोत किंवा वडीलधारी व्यक्ती, बहुतेक लोक वैद्यकीय सल्ल्याने नेब्युलायझर देखील वापरतात. यानेही शरीराला लवकर आराम वाटू लागतो.
५) गुळवेलाच्या पानांपासून ते मुळापर्यंत आणि देठापर्यंत सर्व काही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. गुळवेलाचा रस खोकल्याच्या उपचारात प्रभावी आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही गिलॉयचे सेवन करू शकता. याचे नियमित सेवन शरीराला संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते.
६) आले हे नैसर्गिक अँटी-हिस्टामाइन मानले जाते. आले किसून त्यात मध मिसळून खा. या उपायानं घसादुखीपासून आराम मिळेल.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






