जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.
वृषभ :-
कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
मिथुन :-
मनातील नैराश्य दूर सारावे. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.
कर्क :-
कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका.
सिंह :-
मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात.
कन्या :-
हातातील कामात यश येईल. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका.
तूळ :-
क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.
वृश्चिक :-
घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे.
धनू :-
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मकर :-
धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका.
कुंभ :-
आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा.
मीन :-
सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी.
हेही वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






