जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.
वृषभ :-
अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.
मिथुन :-
मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
कर्क :-
अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
सिंह :-
मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.
कन्या :-
हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.
तूळ :-
कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक :-
कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.
धनू :-
अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मकर :-
नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.
कुंभ :-
चटकन रागवू नका. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.
मीन :-
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






