जळगाव :- जिल्ह्यातील पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल 12 पोलीस कर्मचार्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी काढले आहेत.
पोलीस दलात सेवा बजावित असतांना उत्तम काम करणार्या राज्यभरातील कर्मचार्यांसह अधिकार्यांचे प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक कर्मचार्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असतांना वविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल ११ पोलीस कर्मचार्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
यांना मिळाले पदक…… पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार पुढील प्रमाणे ०१) पोलीस उप निरीक्षक, विनयकुमार भीमराव देसले, ०२) सहा.पोलीस उप निरीक्षक, संजय हरिदास पवार, ०३) सहा. पोलीस उप निरीक्षक, नरेंद्र हिरालाल कुमावत, ०४) पो. हवा. सचिन सुभाष विसपुते, ०५) पो. हवा. सुनील अर्जुन माळी, ०६) पो. हवा. मनोज काशिनाथ जोशी, ०७) पो. हवा. राजेश प्रभाकर चौधरी, ०८) पो. हवा. सुनील माधव शिरसाठ, ०९) पो. हवा. रवींद्र धोंडू घुगे, १०) पो. ना. विजय अशोक दुसाने, ११) पो. ना. अल्ताफ सत्तार मन्सुरी, १२) पो. ना. अमोल भारत विसपुते. यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






