पुलगाव :- पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याने पतीनेही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवार 26 रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.कुंदन कांबळे (45) व शीतल कांबळे (40) अशी मृतकांची नावे आहेत. आंजी मोठी येथील वार्ड 4 मधील माधव भावरकर यांच्या घरी कांबळे कुटुंब किरायाने राहत होते. या दोघांनाही 13 वर्षांची मैत्री व 9 वर्षांचा सम्राट नावाची दोन अपत्य आहेत.
दोन दिवसांपूर्वीच दोन्ही मुलं आपल्या मामाच्या गावाला गेले होते. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच दार बंद असल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे शेजार्यांनी कुंदनचा भाऊ संजय कांबळे यांना याची माहिती दिली. संजयने घरी येऊन आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने थेट पोलिस चौकी गाठून पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद सानप, दीपक जाधव, अमर हजारे यांनी घटनास्थळ गाठून दरवाजा उघडला. यावेळी दोघांचेही मृतदेह आढळून आले.
याबाबतची माहिती खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना देण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता शीतल कांबळे यांच्या डोक्यावर गंभीर इजा दिसून आल्या. घटनास्थळी एक दगड आढळून आल्याने पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. घटनेची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुलसिंग पाटील यांना देण्यात आली. प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद सानप, दीपक जाधव, गिरीश चंदनखेडे, अमर हजारे करीत आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






