जामनेर :- अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता जामनेर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले नेल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मैत्रीणीसोबत शुक्रवारी २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला.
परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल वाटे करीत आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






