जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
अतीविचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल.
वृषभ :-
सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. सगळ्यांचे लक्षपूर्वक करण्यात दमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मिथुन :-
कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा.
कर्क :-
व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो.
सिंह :-
वैवाहिक सौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशनमधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी.
कन्या :-
जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. वडीलधार्या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.
तूळ :-
नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अती उत्साह दर्शवू नका..
वृश्चिक :-
रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल.
धनू :-
घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील.
मकर :-
कौटुंबिक सौख्य जपाल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. बोलतांना कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेअर्स, लॉटरी यांचा अती हव्यास नको.
कुंभ :-
धाडसाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या.
मीन :-
मनाजोग्या वस्तू खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा.
हेही वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






