Viral Video: नवरा बायकोची भांडणं काही कोणाला नवीन नाहीत. मुळात संसार म्हणजे भांड्याला भांडं लागणारच पण काही वेळा पती- पत्नी इतके बेभान होतात की आपण कुठे आहोत हेच विसरतात.
अशाच एका बायकोला नवऱ्यावर राग काढणं जीवावर बेतल्याचे पाहायला मिळतेय. आतापर्यंत ५० लाखाहून अधिक व्ह्यूज असलेल्या व्हायरल व्हिडीओला पाहून अक्षरशः काळजाचं पाणी पाणी होतंय असं म्हणायला हरकत नाही. कुठल्याही नात्यात संयम व शांती का असायला हवी हे सांगणारा हा व्हिडीओ आहे तरी काय, चला पाहूया.
@crazyclipsonly या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, भररस्त्यात एका गाडी थांबते. यातून एक महिला उतरते आणि दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून आतल्या माणसाशी भांडू लागते. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही महिला तिच्या पतीशी भांडतेय असं दिसतंय. व्हिडिओच्या कॅप्शननुसार ज्या रस्त्यावर ही गाडी थांबते तो साधासुधा नसून व्याघ्र प्रकल्पातील रस्ता आहे. ज्यावेळी महिला आपल्या नवऱ्यावर राग काढून भांडत असते तेव्हा अचानक एक वाघ मागून येतो आणि अक्षरशः खेचत या महिलेला घेऊन जातो. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही पार थक्क झाले आहेत.
Video: नवऱ्यावर राग काढणं आलं अंगावर
दरम्यान, या व्हिडीओखालील कमेंट पाहता, या महिलेला वाघ घेऊन जाताच गाडीत बसलेली तिची आई तिला वाचवण्यासाठी गेली. यावेळी महिलेचा जीव तर वाचला पण तिच्या आईवर वाघाने हल्ला केला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा महिलेने भांडण करताना मुद्दा बरोबर असो किंवा नसो जागेचा विचार करायला हवा होता अशा कमेंट केल्या आहेत.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






