जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.
वृषभ :-
मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.
मिथुन :-
स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कर्क :-
घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.
सिंह :-
इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे.
कन्या :-
अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
तूळ :-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.
वृश्चिक :-
कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
धनू :-
आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.
मकर :-
संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा बदलून पहावी.
कुंभ :-
नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.
मीन :-
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






