३४ वर्षीय बायकोला नवऱ्यानं ब्युटी पार्लरला जाऊ दिलं नाही म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल,संपवले स्वतःचे जीवन

Spread the love


इंदूर :- आपली बायको ही सुंदर दिसावी असे प्रत्येकाला वाटतं. यासाठी काही पुरुष आपल्या बायकांना ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करतात तर काही पुरुषांना आपल्या बायकोने ब्युटी पार्लरमध्ये गेलेलं आवडत नाही.
पण नवऱ्याने आपल्यला ब्युटी पार्लरमध्ये जाऊ दिले नाही तर फार फार तर काय बायको रागवेल नाही तर भांडेल. पण इंदूरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेलपतीने ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने एका ३४ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ब्युटी पार्लरमध्ये जाण्यावरून या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात महिलेने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना गुरुवारी शहरातील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रीना यादव असे या महिलेचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेबाबत तपास अधिकारी उमाशंकर यादव यांनी सांगितले की, महिलेचा विवाह 15 वर्षांपूर्वी बलराम यादवसोबत झाला होता. गुरुवारी तिने बलरामला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास विचारले, परंतु त्याने नकार दिला.

यानंतर रीनाने रागाच्या भरात गळफास लावत आपले जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी पती बलराम यादव याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी रीना ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याच्याशी भांडत होती. जेव्हा तिने त्याला पार्लरमध्ये जाण्यास नकार दिला तेव्हा रीना खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला, त्यानंतर त्याने डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने दरवाजा तोडून रीनाला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. आता पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जात आहेत. मात्र, पत्नीने उचललेल्या या पाऊलामुळे पतीलाही धक्का बसला आहे.

टीम झुंजार