जळगाव :- तालुक्यातील वडली येथे सोमवारी (ता. २४) ४० वर्षीय महिलेस तिच्याच मुलाने लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता.२८) रात्री बाराच्या सुमारास महिला मृत झाली.
अक्काबाई सुभाष भिल, असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला जबाबदार असलेला तिचा मुलगा जितेंद्र भिल याला पोलिसांनी अटक केली आहे.
वडली (ता. जळगाव) येथे अक्काबाई मुले जितेंद्र आणि अजय भिल यांच्यासह वास्तव्यास होती. सोमवारी वडलीतील भिलवाड्यात लग्न असल्याने संपूर्ण वाडा लग्नात सहभागी झाला होता.
कुणीतरी आई अक्कबाईबाबत सांगितल्याने दोघेही भाऊ मामा अरुण भिल यांच्या घरी गेले व त्यांनी त्यांच्या आईची माहिती दिली. मामा अरुण याला घेऊन जितेंद्र व अजय रात्री पावणेअकराला अंबर करणसिंग भिल याच्या घरी धडकले.
दार उघडताच नको तेच घडले
तिघांनी अंबर करणसिंग याच्या घराचे दार उघडले. आत शिरताच अक्काबाई नको त्या अवस्थेत अंबर व त्याचा साथीदार सुकलाल दामू भिल यांच्यासह सापडून आली. जितेंद्र भिल याने लोखंडी सळईने आईवर हल्ला चढविला. गंभीर जखमी अक्काबाई बेशुद्ध पडली, तर अंबर व सुकलाल यांनी घरातून धूम ठोकली.
अक्काबाई बेशुद्ध पडल्यावर अरुण भिल यांनी घडलेला प्रकार पोलिसपाटील दिलीप पाटील व सरपंच युवराज गायकवाड यांना कळविला. तत्काळ रुग्णवाहिकेतून जखमी अक्काबाईला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवसांपासून उपचार सुरू असताना, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अक्काबाईचा मृत्यू झाला.
याबाबत मृत अक्काबाई भिल हिचा भाऊ अरुण भिल (वय ३६, रा. वडली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित जितेंद्र भिल यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.
हे देखील वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४