धरणगाव :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघायला मिळाली अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनल ला १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, निलेश चौधरी यांच्या महाविकास आघाडीला जरी स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी जोरदार ताकद लावून प्रतिस्पर्धी महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे.
महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे सेना गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय पवार गट या तीन पक्षात मिळून सहकार पॅनल तयार झालेले होते यात मात्र शिंदे गटाला किती यश आले आहे यापेक्षा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी संजय पवार गट यांच्या सहकार्यानेच महायुतीने सत्ता मिळवली आहे असे दिसून येत आहे.

यामध्ये विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मते पुढील प्रमाणे आहेत (हमाल मापाडी मतदारसंघ) विजय उमेदवार ज्ञानेश्वर वसंत माळी १९९ मते.,( व्यापारी मतदार संघातून) नितीन नंदलाल करवा १५३ मते, संजय रमेश काबरे १४४ मते, (ग्रामपंचायत मतदार संघातून) प्रेमराज परशुराम पाटील ४९० मते, (ग्रामपंचायत मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती मध्ये) संजय जुलाल पवार ५०३ मते .,(ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून) सुरेखा देविदास चौधरी ४८५ मते., रवींद्र भिलाजी पाटील ४११ मते.,( सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून) दिलीपराव उत्तमराव धनगर ५७७ मते.,( सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून )रमेश माणिक पाटील ६२८ मते .,तसेच (सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून) सुरेश सिताराम चौधरी ५५५ मते., सुनील दत्तात्रय पवार ५३२ मध्ये., सुदाम शेनपडू पाटील ५१७ मते., जिजाबराव गिरधर पाटील ५१५ मते .,रघुनाथ धुडकू पाटील ५०७ मते., किरण शांताराम पाटील ५०६ मते व रंगराव दोधु पाटील ५०३ मते याप्रमाणे मतें मिळवून विजयी झाले आहेत.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






