जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आजचा दिवस मध्यम राहील. कामाच्या ठिकाणी तसेच घरात तणाव जाणवेल. गोड बोलून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा मात्र यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. आज शक्यतो दूरचा प्रवास टाळा.
वृषभ :-
आजचा दिवस मिश्र असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवाद-चर्चा करू नका. आर्थिक बाबीवर व्यवस्थित योजना बनवू शकाल. मात्र काही काळानंतर या योजना अमलात आणा. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.
मिथुन :-
आजचा दिवस शुभ आहे. आपल्या मधुर वाणीने आपण इतरांचे मन जिंकू शकता. नोकरीच्या ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याचा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क :-
नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. व्यावसायिकांना धंद्यात वाढ दिसेल. मात्र आज कोणालाही पैसे उसने देणे टाळा. अपुरे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पोटाच्या किंवा डोळ्याच्या समस्या उद्भवतील.
सिंह :-
आजचा दिवस कामासाठी खूप अनुकूल आहे. नवीन कार्ये अथवा प्रकल्प सुरु कराल. नोकरी करणार्या व्यक्तीने उच्च अधिकार्यांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदित राहील. स्वभावातील स्वार्थीपणामुळे जवळच्या मित्रासोबतचे नाते बिघडू शकते.
कन्या :-
आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मात्र यामध्ये जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. आज जिभेवर ताबा ठेवल्यास जोडीदाराची उत्तम साथ लाभू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करणे टाळा.
तूळ :-
दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापाऱ्यांनी सांभाळून व्यवसाय करावा. जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता.
वृश्चिक :-
आज ग्रहांची अपेक्षित साथ लाभणे अवघड आहे. मात्र आत्मविश्वासाने केलेले काम पूर्णत्वास जाईल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. आळशीपणामुळे कोणतेही महत्वाचे काम टाळू नका. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, जिचा भविष्यात फायदा होईल.
धनू :-
कौटुंबिक आणि आर्थिक समस्या कमी होण्यास मदत मिळेल. व्यवसाय अथवा नोकरीची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकारात्मक चर्चा घडेल. भूतकाळातील गोष्टी आठवून मन विचलित होईल मात्र त्यावर जास्त विचार करणे टाळा.
मकर :-
ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. पाण्यापासून आज दूर रहा.
कुंभ :-
महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. नोकरी अथवा व्यवसायामधील अडकलेले काम पूर्ण होईल. आज निर्माण झालेले भावनिक नाते भविष्यात उपयोगी पडेल. मित्रांच्या साथीने नवीन योजना आखाल. पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
मीन :-
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. नोकरीमध्ये दिलासादायक गोष्टी घडतील. इच्छित कार्ये पूर्णत्वास जातील. खरेदीसाठी उत्तम वेळ. मुलांशी खटके उडण्याची शक्यता परंतु त्यामुळे भावनिक होऊ नका. जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता त्यामुळे सावध रहा.
हेही वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






