टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स चे नावे ऑनलाईन फसवणुक करणारी कलकत्ता येथील टोळीला जळगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love


जळगाव :- टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स चे नावे ऑनलाईन फसवणुक करणारी कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील टोळीला जळगाव सायबर पोलीस शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.सविस्तर असे की, गुन्हयातील फिर्यादी डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे 10 सहकारी मित्र यांना सेव्हन सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते.त्याअनुषंगाने त्यांनी फेसबुकवर Thinktrip Travels या नावाची जाहिरात पाहिली ज्यात सहली बाबत 7 सिस्टर (नॉर्थ ईस्ट) 20 रात्र 21 दिवसा करिता एका व्यक्तीस 60,000/- रुपये व जोडप्यांसाठी रु.1,20,000/- अशी जाहिरात होती. त्यानुसार फिर्यादी यांनी Thinktrip Travels चे जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन करून Thinktrip Travels टुर अॅण्ड ट्रॅव्हल्सचे नावाखाली अॅडव्हॉन्स स्वरुपात 3,15,000/- रु. तसेच टुर बुक झाली म्हणुन 7,20,000/- रु. RTPCR व क्वॉरंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी असे 68,800/- रुपये लागतील अशी खोटी बतावणी करुन त्यांनी Thinktrip Travels नावाखाली वेळोवेळी वेगवेगळया कारणांसाठी एकुण 11,03,800/- भरलेले आहेत.

परंतु सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी यांचे सहलीसाठी कोणत्याही प्रकारचे बुकिंग न करता बुकींग केल्याचे भासवुन स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन सायबर पो.स्टे. जळगाव येथे भाग-5 गुरनं. 08/2023 भादवि क.409,420,34 सह IT ACT 66 (डी) प्रमाणे दि. 13/03/2023 रोजी गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले मोबाईल कॉल, व्हॉट्स अॅप मॅसेज, तसेच फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरलेले आहेत त्याबाबत संबधीतांकडुन वेळोवेळी आवश्यक ती माहीती प्राप्त करुन तिचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याव्दारे गुन्हयातील आरोपीतांचा ठावठिकाणा निष्पन्न केला असता सदर आरोपी हे कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी

कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे दि. 26/04/2023 रोजी पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ / राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील असे तपास पथक रवाना झाले होते.सदर गुन्हयातील आरोपी 1. रिकाडों गोम्स पिता क्रिस्टफर गोम्स, वय 36, 2. प्रियांशु बिसवास पिता सैवाल बिसवास, वय 23, 3. अनिकेत बिसवास पिता अभिजीत बिसवास, वय 24 सर्व रा. रा. 1 बी 3 / 9 प्रांतीक फेज 1, कोलकत्ता येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातुन 8 मोबाईल हॅण्डसेट सिमकार्ड सह, 3 संगणक हार्ड डिस्क, 8 ATM Card, 2 चेकबुक, 1 लॅपटॉप, रु.20,000/- रोख, 1 शिक्का असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर तपास पथक आरोपीतांसह दि. 30/04/2023 रोजी जळगांव येथे परत आले आहे.सदर गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि / दिगंबर थोरात, पोना/ दिलीप चिंचोले व पोकों / गौरव पाटील यांनी केले आहे.

नागरीकांना जाहीर आवाहन……
तरी याव्दारे सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन सहल (ट्रीप) बुकींग करतांना सदर ट्रॅव्हल्स एजन्सी खरोखर अस्तित्वात व विश्वास आहे अगर कसे याबाबत सविस्तर खात्री करावी. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवावेत. तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वताः चे नावे बँक खाते तयार करुन देवु नये.

हे देखील वाचा

टीम झुंजार