जळगाव : शहरातील मेहरूण परिसरातील ३६ वर्षीय कामगाराने विषारी द्रव प्राशन करुन एमआयडीसीतील कंपनीतच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सोमवार (ता. १) रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मयताच्या कुटूंबीयाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
शिरपुर येथील मुळ रहिवासी संजय बंडू शेवाळे (वय ३६) गेल्या दहा- बारा वर्षांपासुन कामधंद्यासाठी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. संजय हा एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवार (ता.३०) सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला.कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने एमआयडीसी पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजयच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय ४) आणि सलोनी (वय-६) ही दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.
मयत संजयचा मृतदेह पोलिसांनी कंपनीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. संजयने गळफास घेतलेली जागा आणि त्याचे कपडे पाहिल्यावर त्याने आगोदर विषारी द्रव घेतल्याचे आढळून आले. विष घेतल्यानंतर कसा गळफास घेईल? अशी शंका कुटूंबीय आणि परिचितांनी व्यक्त केली. यामुळे आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४