गोरखपूर : नुकतंच एक अतिशय अजब प्रेम प्रकरण समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये पंचायतीने एका महिलेसोबत तिच्या प्रियकराचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे.वास्तविक, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या महिलेलाही तिच्या पहिल्या पतीपासून 10 मुलं आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला प्रियकरासह गाव सोडून निघून गेली होती. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमप्रकरण सुरू होतं आणि गेल्या एक वर्षापासून दोघेही घर सोडून बेपत्ता होते, असं सांगितलं जात आहे.
हे प्रकरण बडहलगंज जिल्ह्यातील चिल्लुपार भागातील आहे. येथील सोनीदेवीच्या पतीचा 6 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सोनी ही 10 मुलांची आई असली तरी पतीच्या निधनानंतर ती शेजारच्या किल गावात राहणाऱ्या बलेंद्र उर्फ बलाई यादव याच्या प्रेमात पडली. तिच्या प्रेमासाठी बलेंद्रने अजून लग्नही केलं नव्हतं आणि तो अविवाहित होता. दुसरीकडे ही बाब सोनीची मुले आणि गावकऱ्यांना समजताच वर्षभरापूर्वी दोघेही घरातून पळून गेले. माात्र ही महिला वर्षभरानंतर मुलांना भेटण्यासाठी गावात पोहोचलीयाची माहिती मिळताच गावात पंचायत बोलावण्यात आली.
ज्यामध्ये महिला आणि तिचा प्रियकर दोघेही एकत्र राहण्याबाबत ठाम राहिले. यानंतर परस्पर संमतीने पंचायतीने दोघांचं गावातील मंदिरात लग्न लावून दिलं. शिवमंदिरात बलेंद्र उर्फ बलाईने देवाला साक्ष मानून सोनीसोबत विवाह केला. यानंतर दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला.
लग्न झाल्यानंतर वधू सोनी हिला बलेंद्र उर्फ बलाईसह ग्रामस्थांनी निरोप दिला.गावातील गुरुकुल पीजी कॉलेजचे व्यवस्थापक जयप्रकाश शाही आणि प्रमुख प्रतिनिधी सतीश शाही यांनी सांगितलं की, दोघांमध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वर्षभरापूर्वी गाव सोडून गेले होते. परत आल्यावर दोघांनीही पंचायतीत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
ज्यावर मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. या नात्याने दोघेही खूश आहेत. त्याचवेळी, महिलेच्या मुलांना देखील या संबंधात कोणतीही अडचण नाही. त्यांना आधीपासूनच याची माहिती होती.
जयप्रकाश शाही यांनी विवाहित जोडप्याला जागेवरच महाविद्यालयात नोकरीसाठी नियुक्ती पत्रही दिलं. यासोबतच या दोघांनाही गुरुकुल संस्थान समूहाच्या निवासी संकुलात निवास देण्याची घोषणा करण्यात आली. महिला बेघर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तिला घर मिळालं. यासोबतच 10 अनाथ मुलांना वडिलांची सावली मिळाली. आता महिलेलाही सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा देण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






