अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा, व जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा.

Spread the love

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि महाराष्ट्राचे राजकारण या धक्क्याने हादरून गेले. पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी नेते आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

दुसरीकडे या निर्णयानंतर राष्ट्रवादीत राजीनाम सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला समितीतील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आजच राष्ट्रवादील नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाहीत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टीम झुंजार