सीबीआयने पुन्हा एकदा एका मोठ्या अधिकाऱ्यावर छापा टाकून कोट्यवधीची रक्कम हस्तगत केली आहे.
सीबीआयने जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे (WAPCOS) माजी सीएमडी राजेंद्र गुप्ता याच्या घरातून तब्बल 20 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
राजेंद्र गुप्ता याच्या घरात एवढी मोठी रक्कम कुठून आली? कुणाची आहे? याची माहिती सीबीआय गोळा करत आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड WAPCOS हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. हे जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
सीबीआयने राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात तक्रार आली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांकडे अनेक ठिकाणी जमीन आणि मालमत्ता आहे. तसंच त्यांच्या घरात रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली होती.
सीबीआयाने राजेंद्र गुप्ता यांच्या घरावर आणि कमर्शियल प्रापर्टीज जी, दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाजियाबाद सह 19 ठिकाणी आहे. या कारवाईमध्ये राजेंद्र गुप्ता याच्याकडे 20 कोटींची रोख रक्कम आणि कागदपत्र सापडली आहे. एवढी मालमत्ता कुठून आली याचा तपास सीबीआय करत आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






