दौसा :- देशात हुंडाबंदी कायदा असतानाही आजमित्तीस नवरा मुलगा किंवा त्याचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून, पैसे, सोनं-नाणं किंवा गाड्यांची अपेक्षा करतात.
त्यानुसार, मुलीच्या पित्याकडूनही अनेकदा हा लाड पुरवण्यात येतो. मात्र, एका नवरदेवाला लग्नाअगोदर चारचाकी बोलेरो गाडी पाहिजे असा हट्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील या घटनेत नवरदेवाला नवरीकडच्या वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे मुलीकडील मंडळींना नवरदेव आणि त्याच्या काकाला बांधून ठेवलं होतं. अखेर, पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींची समजूत घालून प्रकरण शांत केलं.
१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता. दोन्ही गावं एकमेकांपासून केवळ ११ किमीच्या अंतरावर आहेत. सोमवारी रात्री ७ वाजता विजेंद्रच्या कुटुंबातील लोक वऱ्हाड घेऊन नागल गावात पोहोचले. रात्री ९ वाजता फेरे घेण्यात येणार होते. तत्पूर्वी मुलीकडच्या मंडळींना गावातून वरात काढण्याची सर्वच तयारी केली होती. त्यानुसार, नवरदेवाची वरातही निघाली.
दरम्यान, रात्री ९ वाजता लग्नात फेरे होण्यापूर्वी नवरेदवाने पैशांसह बोलेरो गाडीची मागणी केली. तसेच, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तरच आपण लग्नास तयार होणार, फेरे घेणार असा हट्टच केला. या अडेलपणाच्या भूमिकेमुळे दोन्ही मंडळींमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी, मुलीच्या नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी नवरदेव विजेंद्र आणि त्याचे चुलते पप्पूलाल मणी यांची धुलाई केली. कपडेही फाडले. त्यामुळे, दोन्हीकडील लोकं आमने-सामने आले. लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला, मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवरदेव व नवरदेवाच्या काकांनी धूम ठोकली.
याप्रकरणी विजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांसोबत नवरदेव आणि त्याचे काका पुन्हा मंडपात गेले. त्यावेळी, मुलीच्या मंडळींनी दोघांनाही बांधून ठेवलं होतं. अखेर, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






