अवैद्य प्रवासी वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा महामार्ग व कजगाव चौफुली नेहमी जाम होतो…

Spread the love

पारोळा प्रतिनिधी

पारोळा :- शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून तालुक्या भरात व तालुक्याबाहेर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक ही बिनदास्त केली जात आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामार्गावर तसेच कजगाव चौफुलीवर सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.त्यामुळे वाहनधारकांमध्ये व या भागातील रहिवाशी कडून तीव्र भावना उमटत आहेत.या अवैध प्रवासी वाहतूकीकडे वाहतूक पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून पाठशी घातले जात आहे. या गंभीर प्रकारची वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे झाले आहे.


तालुक्यातून बसेसच्या नियमित फेऱ्या या अद्याप सुरू झाले नाहीत. त्यामुळे खाजगी अवैध प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात आणि बिनदास्त पणे सुरू आहे. पोलिसांचा वाचक नसल्याने या वाहनधारकांकडून बेशिस्तपणे प्रवाशी टपावर बसवून जीवघेणी वाहतूक केली जात आहे.क्षमते पेक्षा अतिरिक्त प्रवाशांमुळे अनेकवेळा आपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडू जखमी झाले आहेत.वाहतूक पोलिसांचे आणि अवैद्य प्रवाशी वाहतूक धारांचे हित संबंध गुंतल्याने या अवैध प्रवासी वाहतूक दारांची दिवसेंदिवस मनमानी वाढत आहे. बस स्थानकाबाहेर, राष्ट्रीय महामार्गावर कजगाव चौफुली वर हे वाहनधारक रस्त्यावरच मनमानी पद्धतीने वाहने उभे करून ती भरत असल्याने महामार्ग , कजगाव चौफुलीवर वाहतुकीचा नेहमीचा खोळंबा होऊन शेकडो वाहनांच्या रांगा या दुतर्फा लागत आहेत . वाहतूक खोळंबा हा रोज होत होत असताना देखील वाहतूक पोलीस या अवैध प्रवासी वाहतूक जणांना काहीएक न बोलता त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे त्यांची मजोरी ही वाढत असून तालुक्यातील जनतेला त्राससह मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार होणार्‍या वाहतूक खोळंबा मुले अनेकदा लहान-मोठ्या वाहनधारकांचे व मोटरसायकल चालकांची वाद देखील होत आहे .परिणामी हा त्रास व मनस्ताप दूर करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस उपविभागीय राकेश जाधव यांनी लक्ष घालून मुजोर अवैध प्रवासी वाहतुकीला वळणावर आणून तालुक्यातील जनतेला या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

टीम झुंजार