माणुसकीचे दर्शन! नारीशक्ती ने बेवारस महिलेस दिले जीवनदान

Spread the love

जळगाव :- दहा दिवसांपूर्वी एमआयडीसी एरियात लक्ष्मी पॉलिमर जवळ 144 येथे काट्यांमध्ये एक महिला बेवारस पडलेल्या अवस्थेत सापडली. रस्त्याने येणारे जाणारे तिच्याकडे पाहून निघून जात होते. जवळच राहणाऱ्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्य वंदना मंडावरे यांना ते दिसले यांनी दोन-तीन जणांच्या मदतीने त्या महिलेस आपल्या शेडमध्ये निवारा दिला अशा अवस्थेत कुठे ठेवायचे म्हणून त्यांनी नारीशक्ती अध्यक्ष मनीषा पाटील यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.

क्षणाचाही विलंब न करता नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील व पदाधिकारी लगेच महिलेला आधार देण्यास धावून आल्या. तिची कोणत्याही प्रकारची ओळख पटत नव्हती. तिला नेण्यासाठी एकही रिक्षा चालक थांबत नव्हता हीच लोकांची मानसिकता इथेच माणुसकी संपली असे वाटत होते. त्याक्षणी आमदार राजू मामा भोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली लगेच तातडीने त्या महिलेस घेण्यात रुग्णवाहिका हजर झाली त्यानंतर तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तिची तपासणी केली असता ती मनोरूग्ण असल्याचे आढळून आले तिची ओळख पटत नव्हती सिव्हील मध्ये गेल्या आठ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते आता तिची प्रकृती चांगली असून तिच्या अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था पुढे उभा राहिला. महापौर जयश्री ताई महाजन यांच्या सहकार्याने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी तिची रवानगी संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र जळगाव येथे तिला हलविण्यात आले. तेथे तिला नेऊन तिची अंघोळ वगैरे घालून तिला बेघर केंद्रात दाखल करण्यात आले

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळावे महापौर जयश्रीताई महाजन , गायत्री पाटील,
जानकी परदेशी, सकु राठोड ,संजय परदेशी, करुणा मराठे, सुभाष राठोड ,गौतम सपकाळ, पप्पू जगताप ॲम्बुलन्स चालक अशोक सपकाळे यांचे ही सहकार्य मिळाले. याप्रसंगी मा. डॉ. विजय गायकवाड साहेब वैद्यकीय अधीक्षक, अध्यक्ष गणेश पाटील संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, लीगल ॲडव्हायझर सौ. वैशाली बोरसे मॅडम, काळजीवाहक हर्षल वंजारी, राजेंद्र मराठे, सौ.शितल काटे सौ. आशा पाटील सौ.गायत्री पाटील तांत्रिक तज्ञ व्यवस्थापक मनपा हे उपस्थित होते.

हे देखील वाचा

टीम झुंजार