प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल : चालू हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने चना / हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे
नाव नोंदणीचे आवाहण एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड , बॅक पासबुक झेरॉक्स व चालू वर्षाचा सन२०२१ / २२ चा ऑनलाइन चना / हरभरा नोंदणी केलेला सातबारा उतारा . ही कागदपत्रे ऑनलाइन नोंदणी करीता दि. १८ I २ I २०२२ पासुन एरंडोल येथील कार्यालयात जमा करावीत .
या वर्षी हमी भाव रु. ५२३०I- एवढा आहे व हरभरा खरेदीवखार महामंडळ कासोदा येथील गोदामात करण्यात येईल असे आवाहन अध्यक्ष . निळकंठ शंकर पाटील व्यवस्थापक अरुण पाटील यांनी केले आहे.