रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील रसलपूर येथील एका घरासमोरील गटारीत रविवार दिनांक ७ रोजी मृत अवस्थेतपुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रावेर पोलिसांत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बाळ जन्मत:च नाळेसहच गटारात फेकून देण्यात आले होते.
रसलपूर येथे मशिदीकडून जाणाऱ्या रस्त्यावर विलास महाजन यांच्या घरासमोरील गटारातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे महाजन यांनी फरशी उचलून पाहिली तर पुरुषजातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी त्यांनी रसलपूर येथील पोलिस पाटील प्रमोद यशवंत धनके यांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी पंचनामा करून मृत अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
व्हिसेरा राखीव…
तीन चार दिवसांपूर्वी अपूर्ण कालावधीत जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक नाळेसह गटारीत फेकून दिले असल्याची माहिती समोर आली असून अर्भकाच्या डीएनए चाचणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४