प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.होतकरू व मनमिळाऊ तरुणांच्या मृत्यूने गाव हळहळले
याबाबत अधिक माहिती अशी की, महारू नामदेव पाटील (वय ३०) हा तरुण मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करीत होता. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत महारु पाटील यांना भोवळ व चक्कर येवून खाली पडला व छाती चोळू लागला.
त्यास प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांनी पाहिले असता सगळ्यांनी मिळून तात्काळ खाजगी वाहनाने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासले असता त्यास मृत घोषित केले. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टर प्रकाश ताळे यांनी शवविच्छेदन करून गावी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.
अक्षय पाटील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महारू हा कष्टाळू तरुण मिस्तरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई वडील, बहीण असा परिवार आहे. कष्टाळू तरुणाच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






