प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर तालुक्यातील निम व दरेगाव येथे गावठी दारू विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील दरेगाव येथे मारवड पोलिसांनी छापा टाकला असता गोपाल बापू पवार हा त्याच्या राहत्या घराच्या मागे मोकळ्या जागेत गावठी दारूची चोरटी विक्री करताना मिळून आला.
त्याचेकडून ३० लिटर गावठी दारू मिळून आली असून नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून फिर्यादी अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.
तसेच तालुक्यातील निम येथे शांताराम सुपडू भील हा त्याच्या घराच्या आडोश्याला गावठी दारू विक्री करताना पोलिसांना मिळून आल्याने त्याच्याकडे ३० लिटर गावठी दारू आढळली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेवून पो.ना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
हे देखील वाचा
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.