एरंडोल,दि.१९ फेब्रु.२२ शनिवार रोजी शहरातील नामांकित संस्था गुरुकुल प्रतिष्ठान संचलित- बचपन प्ले स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल एरंडोल जि. जळगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निश्चित केल्या नियमानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत योग्य ते सर्व नियम व काळजी घेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला (पुतळ्याला)संस्थेचे प्रेरणास्थान सन्माननीय प्रा.श्री प्रमोद पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.सौ. सुरेखा पाटील मॅडम आणि शिक्षकवृंद यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.
या निमित्ताने अश्वारूढ शिवाजी महाराज व जिजाऊ आईसाहेबांच्या रूपात विद्यार्थ्यांनी हुबेहूब पेहराव करून शहरातून संदेश फेरीही काढण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे “अष्टप्रधान मंडळ” रॅलीची शोभा भरभरून वाढवत होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून लेझीम आणि भगवे ध्वज हातात घेवून महाजांच्या जिवनावरील पारंपारीक प्रेरक गितांवर ताल धरला.
आणि शिवजन्मोत्सवा निमित्ताने जनमाणसात प्रेरणा व प्रबोधन व्हावे यासाठी संदेशपर सजीव अप्रतिम हुबेहूब देखावे चौकाचौकात सादर केले व शिवप्रेमींमध्ये जल्लोष,व जयघोषणांनी एरंडोल शहरातील सर्व परिसर दुमदुमून निघाला होता.
अवघ्या शहरात जल्लोषाचे भगवे वातावरण निर्माण झाले होते.यासाठी विद्यार्थ्यां सोबत शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कोरोना चे सर्व नियम (सोशल डिस्टंसिंग मास्क इ.) पाळून कार्यक्रम सुनियोजित पार पाडला. या अद्वितीय कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या प्रा.सौ.सुरेखा पाटीलमॅडम,आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.