लग्नासाठी आले आणि पाय गमवुन बसले! पाचोरा येथे रामप्रहरी रक्ताचा सडा, पिकअप धडकेत चौघे जखमी.

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील महाराणा प्रताप चौकात रामप्रहरी मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत.

मुंबई येथुन बुलढाणा येथे सफरचंद, केव्ही, मोसंबी ने भरलेली महेंद्र कंपनीची पिकअप मालवाहतूक गाडी ने आज दि. १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुंबई कडुन येत असतांना चौकातील दत्त मंदीर च्या ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागिच पडले. अपघातानंतर एकच आहाकार उडाला. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स चालक बबलु पाटील यांना तात्काळ कॉल करुन जखमींना पुढील औषध उपचारासाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशल मध्ये भरती करण्यात आले तर गाडी चालक यांच्यावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत असतांना कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पो कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रकाश भोसले, पत्रकार प्रा. सीएन चौधरी यांनी जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले.

या अपघातात विनोद बारकु पाटील(,३५) कुंदन सुनिलसिंग परदेशी (१७) रा पुनगाव तर अमोल वाघ(२६) हा पाचोरा येथील आहे तर वसंत भाईदास पाटील (४२)हे जखमी झाले तर विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघे पायाचे जागेवर तुकडे पडले होते.

लग्नासाठी आले आणि पाय गमवुन बसले

दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळी एका खासगी लक्झरी ने पाचोरा येथे आले होते चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर पत्ता विचारत अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईक यांची वाट बघत असतांनाच अचानक गाडीने त्यांचे दोघे पाय उडवले यात अमोल चे पाय वाचले. लग्नासाठी आले आणि दोघे पाय गमावले असेच म्हणावे लागेल.

अपघात जखमी विनोद पाटील हाच घरात कर्ता पुरुष आहे त्याचे दोघे पाय गमवावे लागल्याने त्याचा तात्काळ हॉस्पिटल चा खर्च वाळु वाहतुकदार बेरोजगार तरुणांनी यांनी पैसे जमा केले आहेत.

डॉक्टरांच्या रक्तदानाने वाचला प्राण

यात विनोद पाटील यासाठी एबी पॉझिटिव्ह रक्त या दुर्मिळ गटाचे इतक्या सकाळी कुठुन मिळणार म्हणून डॉ सागर गरुड आणि कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी लिलावती हॉस्पिटल चे डॉ वैभव सुर्यवंशी यांना कॉल केल्यावर त्यांनी तात्काळ रक्तदान केले आणि विनोद पाटील ला तात्काळ रक्तदेण्यात आल्याने जीव वाचला .यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे डॉ सागर गरुड, डॉ. सचिन वाघ, डॉ. प्रवीण देशमुख, नरेश पाटील, विजय पाटील यांनी जखमींना उपचारासाठी शर्यतीचे प्रयत्न केले.

चालक मालक एकच पोलीसांच्या ताब्यात
बोलोरो पिकअप चालक मालक पवन रतनसिंग गोटी रा. वसई व क्लिनर सावन भरतसिंग गोटी रा वसई यांना संतप्त जमावाच्या ताब्यातुन पो. कॉ. राहुल बेहरे, पो. कॉ. योगेश पाटील यांनी पोलीस ठाण्यात नेले आहे. गुन्हा दाखल होत आहे

सकाळी फिरायला निघणार्यांना या अपघाताची भिती वाटायला लागली असुन अंतुर्ली फाटा ते जळगाव चौफुली पर्यंत ठिक ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि वेग मर्यादा ठरवली गेली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार