Viral Video : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही इमोशनल असतात, काही मजेशीर असतात.पण सध्या लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ चक्क नवरदेवाची लग्नातच धुलाई करण्यात आली आहे. ही धुलाई दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क नवरदेवाच्या सासऱ्याने केली आहे. नवरदेव, जावई म्हणून त्याला खूप मान असतो.
पण इथं मात्र वेगळंच दृश्य आहे. लग्नात जावयाचा पाहुणचार, मान दूर त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या सारऱ्यांनीच त्याची चपलेने धुलाई केली आहे. भरमंडपात सासऱ्यांनी जावयाला चपलेने धुतलं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेवासमोर एक व्यक्ती हातात चप्पल घेऊन आहे. ती नवरदेवाला चपलेने मारते आहे. बिच्चारा नवरदेव हात जोडून माफी मागतो आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासरा असल्याचं सांगितलं जातं आहे. नवरदेवाने हुंडा मागितला म्हणून सासऱ्यांनी त्याला मारलं, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे नवरदेवाचा नको तो हट्ट. नवरदेवाने लग्नात नको तीच मागणी केली.
त्यामुळे नवरीचे वडील संतप्त झाले. त्यांना इतका राग आला की त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता नवरदेवाला चोप दिला. त्याने लग्नात हुंडा मागितला. हुंडा म्हणून त्याने बाईक मागितली.
सासऱ्यांनी हुंडा द्यायला नकार दिलाच. पण सोबतच हुंडा मागणाऱ्या जावयाला अद्दलही घडवली. तिथंच त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.माजी आयपीएस अधिकारी @ipsvijrk यांनी शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.