वावडदा प्रतिनिधी :- सुमित पाटील
वावडदा :- जळगाव पाचोरा रस्त्यावर वावडदा चौफुली वरती बाजुला गटारीचे 8 दिवसापासुन काम चालु आहे यामुळे वावडदा चौफुली वरती वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याचा प्रकार घडत आहे. आज सकाळी 10 वा देखील वाहतुक ठप्प झाली असल्याने वाहन काढताना गाडीचा धक्का लागल्याने चौफुली वरती मोठा वाद झाला या वेळी ह्या रोडाचे गटारीचे काम योग्य गतीने होत नसल्याने ही वाहतुक समस्या निर्माण होत आहे.या समस्येबाबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंञी ना.गुलाबरावजी पाटील यांच्याकडे गावातील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविंद्र कापडणे यांनी अनेक वेळा बोलुन ही हा ठेकेदार काम करत नसल्याने वावडदा चौफुली वरती ही वाहतुक नेहमी ठप्प होत असते तरी ह्या गटारीचे काम लवकर होऊन पाचोरा ते जळगाव हा मार्ग सुरळीत सुरू करावा ही मागणी वाहन धारक,ग्रामस्थ, वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविंद्र कापडणे यांनी केली आहे.