जालना: पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घालत पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजले. एकी मुलीचा पाच दिवसांपूर्वी तर दुसरीचा मंगळवारी (ता. १६) सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.निर्दयी बापावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या कारागृहात आहे. कृष्णा पंडित (वय 31, रा. शहागड, ता. अंबड) असे आरोपीचे नाव आहे. शिवाज्ञा कृष्णा पंडित असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
कृष्णा पंडित हा कॉम्प्युटरचा व्यवसाय करतो तर त्याची पत्नी मनीषा या एका बँकेत काम करतात. 8 मे रोजी सोमवारी बँक बंद झाल्यानंतर मनीषा या घरी गेल्या होत्या. कृष्णा हा सतत मनीषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. तसेच 8 मे रोजी देखील मनीषा घरी आल्यावर असेच भांडण झाले होते. त्यामुळे नेहमीच्या वादाला कंटाळून मनीषा या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघाल्या होत्या. याचा राग आल्याने कृष्णाने त्यांच्या डोक्यात वीट मारली. ज्यात मनीषा या जखमी झाल्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्त निघाले. त्यांनी तात्काळ खासगी रुग्णालय गाठले आणि उपचार घेतल्यानंतर त्या मावस भावाकडे राहण्यासाठी गेल्या.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजता कृष्णा हा दोन्ही मुलींना घेऊन पत्नीकडे गेला. मनीषा यांना घरी चल, नाही तर मी मुलींना मारुन टाकीन, अशी धमकी दिली.कृष्णा याने रागाच्या भरात दोन्ही मुलींना घराबाहेर घेऊन गेल्यावर कृष्णाने विषारी द्रव पाजले. नंतर त्याने स्वत: विष प्राशन केले. दरम्यान यावेळी पहिली मुलगी श्रद्धा आणि कृष्णा यांना उलट्या होऊन दोघेजण बेशुद्ध पडल्या. नातेवाईकांनी तात्काळ दोघांना सुरुवातीला गेवराई आणि नंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 11 मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास श्रेयाची तर 16 मे रोजी सकाळी शिवाज्ञाची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






