मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलिस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीसोबत एका २२ वर्षीय अश्लिल कृ्त्य करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त शेजारच्यांकडे गेली होती. तुम्ही पाठीमागून या असं आईने मुलाला आणि मुलीला सांगितले. मग भाऊ आपल्या ६ वर्षीय बहिणीला घेऊन जात असतानाच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला हात पकडून घरी आणले.
जेव्हा भाऊ त्याच्या आईजवळ पोहचला तेव्हा चिमुकली कुठे आहे, असं तिने विचारलं. त्यानंतर भावाने ही बाब आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. आरोपी तरुणाच्या घराचा दरवाजा हा बंद असल्याने त्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला. पीडित मुलीच्या आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काय झाले का? याची विचारणा केली असता. तिने घडलेला प्रकार सांगितला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






