चाळीसगाव प्रतिनिधी :- नेहा राजपूत
चाळीसगाव :- चाळीसगाव तालुक्यातील पोहरे गावात गुणवंत जी सोनवणे यांची एक गाव एक तलाव संकल्पनेतून पोहोरे गावांमध्ये लोकसहभागातून तलाव निर्मितीला सुरुवात झाली असून, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे असिस्टंट डायरेक्टर महेश जी चव्हाण यांच्या हातुन भुमिपुजन करून शुभारंभ करण्यात आले.गावात पहिल्याच दिवशी महा श्रमदानाचे आयोजन करण्यात आले आणि गावातून व पंचक्रोशीतून महाश्रमदानाला तीनशे ते चारशे श्रम दात्यांनी पोहोरे तलाव निर्माणला हातभार लावत आहे.
या तलाव निर्माणासाठी नाम फाऊंडेशन सामाजिक संस्थेने पोकलेन उपलब्ध करून दिले.डिझेलचा खर्च लोकसहभागातून व सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.यावेळी गुणवंत दादा सोनवणे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत असताना. जलसंधारणाचे काम 2018 यावर्षी राजमाने गावापासून ते आज भूजल अभियान पर्यंतचे चांगले-वाईट अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. दादांनी जलसंधारणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व आज जलसंधारणाच्या कामांची गरज का आहे याचे महत्त्व पटवून दिले.२०२१ मध्ये २१ गावांमध्ये नाला खोलीकरण व सात गावांमध्ये तलाव निर्माण करून 165 कोटी लिटर जलसाठा भोजन अभियानातून करण्यात आले.
यावेळी लोंढे गावाचे जल वारकरी प्रमोद पाटील यांनी आपला अनुभव मांडत असताना सांगितले की 70 वर्षापासून रखडलेला बोरकुंड रस्त्याचे काम; तीन महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून पायीसुद्धा चालता येत नव्हते. गुडघ्याइतके पाय फसायचे व शेतकऱ्यांच्या शेतात आलेला माल शेतातच अडकून राहायचा चांगला भाव असताना माल न विकता आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक हानी सहन करावी लागायची. यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात जास्तच अडकत चालला होता.अनेक शेतकऱ्यांना याची जाण होती व त्यांनी गुणवंत दादांचा समोर हा विषय मांडला दादांनी एका शब्दात मशीन उपलब्ध करून दिले. गावातील सर्व शेतकऱ्यांनी डिझेल टाकून या रस्त्याचे काम करून घेतले व आज शेतीत आलेला माल वेळेवर विकला जाऊ शकतो असे अनुभव समाजाला जलसंधारण विषयी परिपक्व बनवतात.
यातून प्रोत्साहन घेऊन पोहोरे गावातील ग्रामस्थ गाव तलाव निर्माण होण्यास खूप उत्साहाने सुरुवात केली. आम्ही तलाव निर्माणासाठी काही अपूर्ण पडू देणार नाही असे वचन केले. लवकरच शिवारफेरी करून जलसंधारणाचे विविध उपचारही करण्याची इच्छाशक्ती गावाने दाखवली. माथा ते पायथा उपचार करून पोहरे गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करू असा सकारात्मक दृष्टीकोन गावाने दाखवला. या वेळी महेश जी चव्हाण सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे असिस्टंट डायरेक्टर, विजय जी सेवा सहयोग टीम सदस्य,सुचित्रा ताई, तूफान खोत कृषि साहाय्यक,अमित पाटील सामाजिक वनीकरण विभाग तसेच पंचक्रोशीतील श्रमदाते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.