प्रतिनिधीं l धरणगाव
धरणगाव :- जळगाव अमळनेर कडे दुचाकीने जाणाऱ्या जळगावच्या एका बांधकाम ठेकेदाराला अज्ञात पाच सहा चोरट्यांनी सिनेस्टाईल अडीच लाखाची लूट केल्याची खळबळ जनक घटना दिनांक २३ मे रोजी दुपारच्या सुमारास धरणगाव पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील मसले गावी घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी वय 35 राहणार ताडेपुरा अमळनेर हल्ली मुक्काम मेहरुन जळगाव असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पाठीत चाकूने वार केल्याने ते गंभीर झाले होते.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की राजेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून अमळनेर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते त्यांच्यासोबत एका जागेच्या व्यवहारासाठी नेत असलेले अडीच लाखांची रोकड होती धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास मसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकी वरील सहा जणांनी त्यांना अडवले काही करण्याच्या आत्ताच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने तीन वार केले
आणि त्यांच्याकडील अडीच लाख रुपये व दुचाकी स्काऊट चोरटे अमळनेरच्या दिशेने प्रसार झालेत यानंतर सूर्यवंशी हे जखमी अवस्थेत नसले गावाकडे निघाले त्याच वेळी धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते त्यांनी जखमी सुरवसे यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क सादर घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात रावांनी केले तर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम