How to consume Gulkand for constipation and acidity? उष्णता वाढल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासांवर औषध म्हणून १ चमचा गुलकंद ठरतो गोड उपाय.
बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या कोणाला कधीही होऊ शकते. अनेकांना जंक फूड खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता व ॲसिडिटीचा त्रास होतो. काहींना ॲसिडिटीचा त्रास दररोज होतो. पण हे लोकं या समस्येला दुर्लक्ष करतात. पण या समस्येला दुर्लक्ष न करता त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेची समस्या, पोट नीट साफ न होणे, ॲसिडिटीचा त्रास, या समस्यांवर एक घरगुती उपाय आपल्याला मदत करू शकेल.
यासंदर्भात, डायटीशियन रिद्धिमा बत्रा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी या समस्यांवर उपाय म्हणून गुलकंद सरबत या रेसिपीची कृती शेअर केली आहे. या उपायामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या कमी होईल व आपल्याला आराम मिळेल(How to consume Gulkand for constipation and acidity?).
गुलकंद सरबतचे फायदे

गुलकंद सरबताचे सेवन केल्याने शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात. यातील पौष्टीक गुणधर्म आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते. ज्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया व म्यूकस वाढण्यास मदत होते. या कारणामुळे पोट साफ राहते.
जर सकाळी तुमचे पोट साफ होत नसेल तर, गुलकंदाचे सरबत प्या. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते. तसेच अँटी-अॅसिडिटी गोळ्यांमुळे शरीराला झालेले नुकसान दुरुस्त करते.
डिंकाच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. सब्जा सीड्समध्ये पेक्टिनसह फायबर आढळते. पेक्टिन हे प्रीबायोटिक आहे. जे चयापचय सुधारण्यास आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यात मदत करते. त्यामुळे ॲसिडिटीही कमी होते.
गुलकंदाचे सरबत करण्यासाठी लागणारं साहित्य
https://www.instagram.com/reel/CfBnDc5DUE9/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ=
सब्जा सीड्स
- डिंक
- गुलकंद
- दूध
कृती :
सर्वप्रथम, एका ग्लासमध्ये एक चमचा गुलकंद, २ टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स, २ चमचे भिजवलेले डिंक, व २०० मिली दूध घालून मिश्रण चांगले मिक्स करा. साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर त्यात २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. अशा प्रकारे गुलकंदाचे सरबत रेडी.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






