आत्महत्येपूर्वी शालकास केला होता फोन.
जळगाव : शहरातील कासमवाडी येथे राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.
संजय चावदस सपकाळे (वय-५५, रा. कुवारखेडा ता. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) हे पत्नी व मुलीसोबत वास्तव्याला होते. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावांशी भांडण होते.
शालकाला केला फोन. दरम्यान मंगळवारी (२३ मे) सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला. या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली होती. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






