जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
नसते साहस करायला जाऊ नका. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.
वृषभ :-
मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.
मिथुन :-
संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.
कर्क :-
रेस, सट्टा यांतून लाभ होईल. कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.
सिंह :-
मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.
कन्या :-
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
तूळ :-
जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.
वृश्चिक :-
जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
धनू :-
इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.
मकर :-
नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
कुंभ :-
रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.
मीन :-
जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






