किसान महाविद्यालयात जागतिक मातृभाषादिन साजरा

Spread the love

पारोळा प्रतिनिधी

पारोळा :- २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर बोली भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून मातृभाषा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन किसान महाविद्यालयातील भाषा वाङ्मय मंडळाच्यावतीने जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख अविनाश अहिरे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सविता चौधरी,डॉ. दीपक साळुंखे, प्रा. प्रमोद चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषा वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप औजेकर यांनी केले, यावेळी बोलताना त्यांनी युनेस्कोने जागतिक स्तरावर मातृभाषा संवर्धन संबंधी करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. प्रमोद चौधरी यांनी जागतिकिकरण आणि मातृभाषा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. सविता चौधरी यांनी अहिराणी बोली आणि सांस्कृतिक संदर्भ याविषयावर प्रबोधन केले, तर डॉ. दीपक साळुंखे यांनी मानवी मातृबोली आणि वैज्ञानिक मानसिकता याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. अविनाश अहिरे यांनी बोलताना, विज्ञानाच्या शिष्ट मानसिकतेत मातृभाषेचा आपण तुच्छ समजतोय सर्वांनी आपली मातृभाषा बोलावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अहिराणी बोलीचा परिसर आणि इतिहास याविषयी प्रा. अहिरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले, यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

टीम झुंजार