पारोळा प्रतिनिधी
पारोळा :- येथील राष्ट्रिय महामार्गालगत बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी शनिवार रोजी शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन, व्याख्यान आणि गौरव सोहळा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या चंद्रकांत बी पाटील मा नगराध्यक्ष पारोळा यांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील , प्राचार्य डी आर पाटील,उपप्राचार्य संजय भावसार,सहा पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, जगदीश आफ्रे,संजय सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी ऊद्योन्मुख शिवशंभु व्याख्याते व युवानेते शिवश्री पंकज रामचंद्र बाविस्कर शिवरांयांच्या समताधिष्ठीत राज्यकारभार विषयी व्याख्यान दिले व त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विवीध पैलुंचा उलगडा करीत शिवरायांचे विचार अंगीकारने गरजेचे असल्याचे मत बाविस्कर यांनी व्यक्त केले.
शिवरायांनी आपल्या स्वराज्यात जातीयता न पाळता बारा बलुतेदारांना समान न्याय व हक्क देत एकतेचा संदेश दिला असून शिवरायांच्या आदर्श आपण घ्यावा असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बी पाटील यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना शिवरायांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात मंडळ अधिकारी शांताराम पाटील,तलाठी निशिकांत माने, तलाठी भूषण बाविस्कर,डॉ पृथ्वीराज पाटील, भिकन अहिरे, सुयोग गॅस एजन्सीचे रवींद्र सोनार ,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, संदीप पाटील ,शेख जुबेर, संजय भोसले, सुनील जाधव, शैलेश पाटील, जयेश पाठक, सचिन पाटील , संदीप पाटील , प्रवीण वानखेडे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शहरातील मान्यवर तसेच भिम आर्मी सामाजिक संघटनेचे- तालुका प्रमुख जितेंद्र एम वानखेडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रताप पाटील, मनोहर केदार, अरविंद जाधव, शाम जाधव, अनिल सोनवणे, विनोद पाटील, सचिन खेडकर, शोभाताई पाटील, नीलम वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.