नापिकी आणि कर्जाला कंटाळून वृद्ध शेतक-याची आत्महत्या

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल :- सततची नापिकी,पावसामुळे कापूस आणि कांद्याचे नुकसान झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या खडकी बुद्रुक (ता.एरंडोल) येथील साठ वयोवृद्ध शेतक-याने आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत माहिती अशी,की खडकी बुद्रुक येथील हिम्मत फकीरा पाटील (वय-६०) यांची कोरडवाहू शेती होती.त्याचेवर विविध कार्यकारी सोसायटीचे पानास हजार रुपये व खाजगी सावकाराचे कर्ज होते.सततची नापिकी,पावसामुळे कपाशी आणि कांद्याचे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते.तसेच पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या दोन म्हशी मरण पावल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे देखील निधन झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते.आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हिम्मत पाटील यांनी राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.सकाळी सहा वाजेच्या सुमारास जितेंद्र पाटील याना वडील हिम्मत पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी गावातच राहत असलेल्या चुलत भाऊ भरत संतोष पाटील याना माहिती दिली.सुनील सुकलाल पाटील,जितेंद्र पाटील,भरत पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हिम्मत पाटील याना ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मयात झाल्याचे वाद्याकीय अधिका-यांनी सांगितले.मयात हिम्मत पाटील यांचे पच्छात पत्नी,एक विवाहित मुलगा,दोन विवाहित मुली जावई,सुना असा परिवार आहे.याबाबत भरत संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

टीम झुंजार