जळगाव : रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला डंपरने धडक दिली.यामध्ये लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. अपघातानंतर सोबत असलेल्या पोलिस स्कॉड वाहनातच जखमींना जळगावला हलविण्यात आले. हा अपघात शनिवारी रात्री ८:४५ वाजता जळगाव तालुक्यातील करंज-धानोरा दरम्यान झाला.
शनिवारी संध्याकाळी सात वाजता कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे वाहनातून (क्र.एम.एच. १९, बी.यू. ९९९) जळगावकडे येत होते. त्या वेळी चालकासह अंगरक्षकही वाहनात होते व मागे पोलिस स्कॉड होते. त्या वेळी डंपरने (एम.एच. १९, झेड – ६२४५) आमदार सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान होऊन वाहनातील चारही जणांना दुखापत झाली. अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी नेण्यात आले. दरम्यान अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४