IPL : पावसामुळे अंतिम सामना होणार आज (२९ मे) राखीव दिवशी

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८ मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी (२९ मे) राखीव दिवशी विजेत्याचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.

अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री ११ वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून राखीव दिवशी खेळवला जाईल.

रात्री नऊ वाजता पाऊस थांबला होता आणि मैदान जवळपास खेळण्यायोग्य झाले होते, पण पाऊस पुन्हा आला. त्यानंतर रात्री ११ वाजता पाऊस थांबला.

आयपीएलने या सामन्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिले की, आयपीएलची फायनल २९ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना राखीव दिवशी होणार आहे. आजची तिकिटे उद्या वैध असतील. आम्ही तुम्हांला तिकीट सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो.

हे पण वाचा

टीम झुंजार